वैभववाडी – फोंडा मार्गावर कोसळले झाड : वाहतूक ठप्प

वैभववाडीत पावसाचा जोर कायम

वैभववाडी | प्रतिनिधी

लोरे नं. 2 गोसावी हॉटेल नजीक आकेशियाचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वैभववाडी – फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फोंडा कणकवलीकडे जाणा-या दोन एसटी बस अडकून पडल्या आहेत.

वैभववाडीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका फोंडा – वैभववाडी मार्गाला बसला आहे. लोरे नं.2 गोसावी हॉटेल नजीक आकेशियाचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ झाड बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.