मालवण | प्रतिनिधी : अतिवृष्टीत मालवण शहरातील वायरी मुस्लिम मोहल्ला येथील एका कुटुंबाची घराची भिंत पडून नुकसान झाले होते. याठिकाणी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्याकडून नुकसानग्रस्त कुटुंबीय यांना देण्यात आलेली आर्थिक मदत भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त यांना सुपूर्द केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, कमलेश कोचरेकर, ईन्तू शेख, हसरत खान, रसुल खान, बाबा शेख, नझीर शेख आदी उपस्थित होते.
फोटो : निलेश राणेंच्या माध्यमातून वायरी मुस्लिम मोहल्ला येथील आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देताना भाजप पदाधिकारी. (अमित खोत, मालवण)








