वैभववाडीत भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर

वैभववाडी l प्रतिनिधी :     जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून वैभववाडीत भाजपाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे. वैभववाडी तालुक्यात 3 जिल्हा परिषद मतदार संघ व 6 पंचायत समिती मतदार संघाचा समावेश आहे.

       जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे – कोळपे जिल्हा परिषद – श्री प्रमोद पुंडलिक रावराणे, कोकिसरे जिल्हा परिषद – श्रावणी रोहन रावराणे, लोरे जिल्हा परिषद – रिद्धी रितेश सुतार.

पंचायत समिती मतदारसंघ निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे – भुईबावडा पंचायत समिती – देवानंद बाळकृष्ण पालांडे, कोळपे पंचायत समिती – सुवर्णा महेश संसारे, उंबर्डे पंचायत समिती – साची सचिन कोलते, कोकिसरे पंचायत समिती – साधना सुधीर नकाशे, खांबाळे पंचायत समिती – मंगेश तुकाराम लोके, लोरे पंचायत समिती – सिद्धेश दिलीप रावराणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.