सातोसे देऊळवाडीत झाड पडून रस्ता बंद

वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित

सावंतवाडी । प्रतिनिधी : सोमवारी सकाळपासून सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर थोडासा कमी झाला असला तरी पडझडीच्या घटना मात्र सुरूच आहेत. सातोसे देऊळवाडी येथे रस्त्यालगत असलेले झाड पण म्हणून पडल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला. तर हे झाड विद्युत वाहिन्यांवर पडल्यामुळे विजापुरवठा देखील खंडित झाला आहे. याबाबतची माहिती सातोसे ग्रामसेवक यांनी दिली आहे.