हिंदू समाजाला बळकट करणे माझे परमकर्तव्य! पालकमंत्री नितेश राणे

▪️विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आयोजित ‘रील्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात!

मसुरे | झुंजार पेडणेकर :मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आमदार म्हणून कार्य करत असलो, तरी त्याही आधी मी एक ‘कट्टर हिंदू’ म्हणून तुमच्या सोबत सदैव उभा आहे. आपल्या हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याची सुरक्षा करणे हे माझे परम कर्तव्य आहे. ही रील्स स्पर्धा केवळ स्पर्धा नसून हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सिंधुदुर्ग यांच्या वतीने हिंदू धर्मावर होणारी विविध आक्रमणे, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण यांसारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रील्स’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र आहे. हे ओळखून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ‘रील्स स्टार्स’नी लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या ज्वलंत विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.

विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री मोहन साळेकर यांनी सावरकरांच्या ‘सद्गुण विकृती’चा दाखला देत ते म्हणाले, “आज आपल्या मुली लव्ह जिहादच्या शिकार होत असताना ‘हे संकट दुसऱ्यावर आहे, मला काय त्याचे?’ ही वृत्ती घातक आहे.

स्पर्धेतील विजेते असे- प्रथम- संकेत हसोळकर व टीम, द्वितीय- सोलकढी साऊथची, तृतीय- ऋग्वेद केरकर व टीम

वैयक्तिक श्रेणीतील विजेते- उत्कृष्ट अभिनेता मकरंद मयेकर, उत्कृष्ट अभिनेत्री मी सोलकढी साऊथची, उत्कृष्ट बाल कलाकार विघ्नेश विशाल मसुरकर, उत्कृष्ट लेखन स्वर्गातलो कोकण, उत्कृष्ट दिग्दर्शन हापूस गँग, निर्मिती नियोजन सिद्धेश चव्हाण तसेच अरूश्री सावंत, मथुरा सावंत, संगीता सावंत, शीतल मसुरकर, अनुषा पिळाई, रिना मराळ, मीनाक्षी सावंत-भोसले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जुबेर खान यांचा धर्मरक्षक मित्र म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याला जिल्हा मंत्री आनंद प्रभू, जिल्हा बजरंगदल संयोजक कृष्णा धुरपंवर, कोकण विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, मालवण बजरंग दल प्रखंड गणेश चव्हाण, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अमोल गावडे, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, कणकवली प्रखंड अध्यक्ष नंदकुमार आरोलकर, जिल्हा सहमंत्री चिन्मय रानडे, मालवण प्रखंड पालक विलास हडकर, शिवप्रेमी शिल्पा खोत, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड सहमंत्री हरेश पडते, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्निल घाडी, पार्थ डिचवलकर, सिद्धनाथ नाटेकर, निलेश साळगावकर, अथर्व केसरकर, सचिन वराडकर, गजानन मांजरेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लारा मयेकर यांनी केले.

‘ही तर केवळ झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे’ असा निर्धार करत आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून सुरू झालेला हा जागर भविष्यात अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.