घरांची पडझड : झाडे उन्मळली : रस्तेही गप्प
आंबोलीत पाण्यात बुडून म्हेस मृत्युमुखी
सावंतवाडी । प्रतिनिधी : आठवडा उलटून गेला तरीही सावंतवाडी तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मातीच्या घरे व घरांच्या भिंती कोसळत आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे उन्हाळून पडल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्ते कसले आहेत तर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. वीज काम उन्हाळ्यामुळे तसेच वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला असून गावागावात महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

गुरुवारी देखील सावंतवाडी तालुक्यात पडझड सुरू होती. सावंतवाडी खासगीलवाडा गोठण येथील पत्रकार शैलेश मयेकर यांच्या घराची भिंत कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर चौकुळ गावात केगद बेरडकी येथील वसंत गोविंद नाईक यांचे घर पडल्यामूळे अंदाजे नुकसान २ लाख रुपयांचे नुकसान झाले.विलवडे टेमवाडी येथील राजेश श्रीराम सावंत यांच्या घराची भिंत पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व नुकसानींचा महसूल विभागातर्फे पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.

दरम्यान, आंबोली येथील नवलू लखु पाटील यांची म्हैस पूराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात आणखी एक म्हैस वाहून गेली होती. कलंबिस्त ते ओवळीये मार्गावरील जुन्या पूलाच्या पायऱ्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्या. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली आहे.आंबोली फणसवाडी धरण परिसरातील महामार्गालगत मोठे झाड धोकादायक अवस्थेत पडले होते. त्यामुळे रहदारीचा मार्ग असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता अखेर ते झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कणेरी कुपवडे रस्ता सातोळी बावळट चिलेवाडी
येथे पावसामुळे खचला असून एकेरी वाहतूक चालू होती. परंतु रात्री सदर रस्ता बसण्याची शक्यता असून त्यामुळे बांदा पोलीस चौकी व आंबोली पोलीस चौकी मध्ये वाहतूक बंद करण्याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. सदर रस्त्याची उद्या शनिवारी दुरुस्ती करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी दिली.












