ढोकमळे येथील उतारातील वळणात बोलेरो गाडी पलटून अपघात; 13 जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील नेवरे बाजारपेठेतील ढोकमळे येथील उतारातील वळणात बेदकारपणे बोलेरो गाडी पलटून अपघात झाला.यात बोलेरोमधील 13 जणाां दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुणालयात उपचार करण्यात आले.अपघाताची ही घटना मंगळवार 25 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वा.घडली आहे.
जयदीप जाधव (29,रा.धामणसे बौध्दवाडी),प्रिती संजय जाधव (30, धामणसे बौध्दवाडी),प्रियल लोगडे (36,रा.नेवरे लावगणवाडी),भावना कोलगे (40,रा.कोतवडे ढोकमळे),रेणुका गोणबरे (21,रा.धामणसे),विना गावडे(44,रा.कोतवडे ढोकमळे),आरोही जाधव(30,रा.धामणेस रत्नागिरी),निलश्री इरमल (44,रा.धामणसे इरमलवाडी),निलम कोलगे (42,रा.ढोकमळे),दिव्या शेलार (33,रा.नेवरे उंबरवाडी),काव्या शितप (24,रा.ढोकमळे),प्राची पवार (29,रा.धामणसे हटवाडी),प्राची गावडे (26,रा.इरमलवाडी,रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी बोलेरो चालक प्रशांत विलास पाटील (25,रा.ढोकमळे कोतवडे,रत्नागिरी) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार,मंगळवार 25 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वा.पिंट्याने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एमएच-08-डब्ल्यू-2461) मधून तब्बल 20 जणांना बसवून नेवरे उर्मिला कॅशु अ‍ॅग्रो प्रोडक्ट प्रा.लि या कंपनीतून नेवरे बाजारपेठ जात होता.तो ढोकमळे फाटा येथील उतारातील वळणात आला असता त्याचा गाडीवरील ताबा सूटल्यामुळे गाडी डाव्या बाजुला पलटी होउन हा अपघात झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.