रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विनायक भराडी व इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागातील पी एच डी चे विद्यार्थी श्री. प्रवीण जांगिड व श्रीमती गीतांजली सावंत यांनी जर्मन पेटंट कार्यालयाकडे ” ए सिस्टिम फॉर सेक्युअरली अपडेटिंग बायोमेट्रिक फिचर व्हेक्टर्स यूझिंग द एज ऍडप्टेशन फिचर व्हेक्टर ऑन ब्लॉकचेन” साठी स्वामित्व हक्क अर्ज दिनांक २१ जून २०२३ रोजी दाखल केला होता . हे पेटंट ब्लॉकचेन संबंधित आहे.
हे पेटंट जर्मनी पेटंट कार्यालयामध्ये ” ए सिस्टिम फॉर सेक्युअरली अपडेटिंग बायोमेट्रिक फिचर व्हेक्टर्स यूझिंग द एज ऍडप्टेशन फिचर व्हेक्टर ऑन ब्लॉकचेन” या शीर्षकासह दिनांक २८ जून २०२३ रोजी मंजूर, नोंदणीकृत आणि प्रकाशित झाले आहे. हे पेटंट फिनोलेक्स अॅकॅडमीला जर्मनी पेटंट कार्यालयाकडून २० वर्षासाठी मिळाले आहे. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा यांनी यांचे अभिनंदन केले.











