रक्त विकारांचे निदान आणि उपचारासाठी महत्त्वाचे पाऊल
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार
चिपळूण (प्रतिनिधी) : ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथे नुकताच हिमॅटोलॉजी विभाग सुरु करण्यात आला आहे. विविध रक्त रोग (ब्लड कॅन्सर) असलेल्या रुग्णांसाठी याठिकाणी योग्य निदान व उपचार प्रदान केले जातील. या सेंटरमध्ये हिमॅटोलॉजिस्ट डॉ सारंग वाघमोरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या उपचार पुरविले जाणार आहे.
हिमॅटोलॉजी हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, जे रक्त आणि रक्त तयार करणाऱ्या ऊती आणि त्यांचे कार्य समजून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रक्त विकारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन ठरते आहे. हिमॅटोलॉजी हे रक्त आणि रक्त तयार करणाऱ्या ऊतींचा वैज्ञानिक अभ्यास आहे, ज्यामध्ये पेशी, प्रथिने आणि रक्त निर्मिती आणि कार्यामध्ये गुंतलेल्या जैवरासायनिक प्रक्रियांचा समावेश आहे. यामध्ये रक्तपेशींची रचना आणि कार्य तपासणे, तसेच रक्त विकारांचे निदान आणि उपचार यांचा समावेश होतो. हिमोफिलिया, रक्ताच्या गुठळ्या, सिकलसेल रोग, हिमोफिलिया, इतर रक्तस्त्राव विकार आणि रक्त कर्करोग यांसारख्या आजारांवर आता चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये वाजवी दरात उपचार घेता येणार असून महिन्यातील प्रत्येक सोमवारी १० ते ४ यावेळेत याठिकाणी रुग्णांकरिता ओपीडी सेवा उपलब्ध असणार आहे. याशिवाय पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कॅन्सर रुग्णांकरिता मोफत उपचार करण्यात येणार आहेत.











