डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पालक-शिक्षक सर्वसाधारण सभा संपन्न

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड ता.विकास मंडळ, मुंबई F-1428 संचलित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ही सभा संपन्न झाली. या प्रसंगी संस्थेचे चिटणीस अॅड.अभिजित गांधी, प्राचार्या सौ.प्रतिभा पाटील, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर, पर्यवेक्षक श्री बैकर सर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रचंड संख्येने विद्यार्थीवर्गाचे पालक हजर होते. पालक-शिक्षक संघाचे प्रमुख श्री शिरगिरे सर आणि दहिभाते सर यांनी प्रस्तावना आणि सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विशेष हजेरी दै.प्रहार चे पत्रकार आणि पालक असलेले श्री.विजय पवार,स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक श्री समेळ सर आणि पालक शिक्षक संघाचे माजी पदाधिकारी हजर होते.

या संघाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हा आहे.त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांची सर्वोपतरी काळजी घ्यायला पाहिजे.आपले विद्यार्थी हुशार आहेत.फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे.त्यासाठी संस्था पदाधिकारी योग्य ती पावले उचलत आहे.पालकांचे सहकार्य आवश्यक आहे.अशा प्रकारचे मार्गदर्शन श्री गांधी साहेब, प्राचार्या सौ.पाटील मॅडम, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर,श्री.समेळ सर यांनी केले.

कला शाखेचे करिअरमध्ये असलेले महत्व आणि विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे वाढलेला कल याविषयी श्री.भालके सर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी आभारप्रदर्शन श्री शिरगिरे सरांनी केले आणि सभेची सांगता झाली.