वेंगुर्ले : प्रतिनिधी
आझाद मैदान, मुंबई येथे श्री. दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धनगर एस टी आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनीही श्री. बापू खरात यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून आपले प्रतिनिधित्व केले..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बापू खरात (कणकवली), सचिन हुंबे (वैभववाडी), संतोष साळसकर (देवगड), लक्ष्मण खरात (वैभववाडी), सुरेश शेळके (वैभववाडी), पांडुरंग गोरे, धावू बोडके (कणकवली), प्रकाश गावडे (पोखरण), योगेश बोडके (कणकवली), संतोष कोकरे (वैभववाडी), प्रकाश गुरखे (वैभववाडी), विजय खरात (कणकवली), योगेश खरात (कोळोशी), राजेंद्र खरात (कळसुली), रामचंद्र शिंगाडे (मालवण), सखाराम खरात (मालवण) बापू जंगले देवगड आदींनी उपोषणकर्ते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांची भेट घेऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून धनगर समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होत आहे. मुंबईतील धनगर समाजानेही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी केले आहे.
दरम्यान, उपोषणाचा आज आठवा दिवस असून त्यांच्या प्रकृतीत खालावलेपणा जाणवत आहे. त्यामुळे समाजबांधवांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून त्यांचे मनोबल वाढवावे आणि आंदोलनाला ठाम पाठिंबा द्यावा, असे आवाहन धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.












