मसुरे स्वामी समर्थ मठाचा वर्धापनदिन 26 एप्रिल पासून!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ मठ. मसुरे मर्डेवाडी येथे 15 वा वर्धापन दिन सोहळ्या निमित्त सग्रह श्री स्वामी समर्थ सिद्धयाग आणि नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. २६ एप्रिल सकाळी ८ ते १ वा.- प्रायश्चित्त, शांतीपाठ, गणेश पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वरण, प्राकारशुद्धी, देवता स्थापन, सप्तशती पाठ जप, अग्नी स्थापन, नवग्रह देवतांचे आवाहन पूजन, गृहयज्ञ, लघुपूर्णाहुती, आरती, प्रसाद.दुपारी १ ते ३ वा.

महाप्रसाद,सायं ५ वा.

श्री स्वामी समर्थ पालखी नगर प्रदक्षिणा,

रात्री ७ वा.सुस्वर भजन (बांदिवडे), रात्रौ ९ वा. सुस्वर भजन बुवा श्री. शशिकांत सावंत (तरंदळे, खोतवाडी).

२७ एप्रिल २०२६

सकाळी ८ ते १ वा.

शांतीपाठ, स्थापित देवता पूजन, सप्तशती हवन, श्री सद्गुरु देवता-हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, महाप्रसाद, दुपारी १ ते ३ वा.

महाप्रसाद, सायं ४.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा, रात्री ७.०० वा.”अभंगवाणी” कार्यक्रम गायकः कु. तन्मय मेस्त्री, कु. चैतन्य भोगले, कु. सोहम चिंदरकर.पखवाज विघ्नेश मेस्त्री, तबला शुभम मेस्त्री.रात्रौ ९ वा.

स्थानिक सुस्वर भजन

विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मर्डेवाडी.उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष बाबुराव प्रभूगावकर यानी केले आहे.