मैत्रिणीला भेटतो या रागतून तरुणाला मारहाण

रत्नागिरी ः प्रतिनिधी
आपल्या मैत्रिणीला भेटतो या रागातून राजीवडा पुलाखाली एका तरुणाला चार जणांनी मिळून जबर मारहाण केली. याप्रकरणी चार संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 26 मार्च रोजी रात्री 9.30 वा. सूमारास घडली.
रमजान नवाज मिरकर, साजिद बाबा मिरकर,अझरुद्दीन अलीमिया मुजावर, महम्मद बावा मिरकर (सर्व रा.राजिवडा पुलाखाली,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अरमान नझीर होडेकर (29, रा.राजीवडा पुलाखाली,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि संशयित हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यातील रमजान मिरकर याची मैत्रिण अफरिन बली ही जैतापूर येथे राहते. ती फिर्यादी अरमान होडेकरचीही मैत्रिण आहे. दरम्यान अरमान हा अफरिनला भेटण्यासाठी गेला असता तिने रमजान मिरकरचा गॉगल,चादर वगैरे सामान अरमानतर्फे पाठवून दिले होते.
त्यावरुन अरमान हा आपल्या मैत्रिणीला भेटतो त्याच्याशी ती बोलते असा रमजानने समज करु घेत त्या रागातून त्याने गुरुवारी रात्री अरमान सोबत वाद केला. त्यावेळी अन्य तीन संशयित ही त्याठिकाणी आले त्यानंतर या सर्वांनी मिळून अरमानला शिवीगाळ करत लाथाबक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.