खेम वरदान पालपेणे संघाला उपविजेतेपद
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तळवली येथे प्रथमच ग्रामदेवता श्री सुकाई देवी चषक 2026 चा दिल दोस्ती दुनियादारी संघ विजेता ठरला तर खेम वरदान पालपेणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत करणारे प्रशांत केळसकर यांच्या शुभहस्ते झाला. तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवी ही नवसाला पावणारी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी भव्य मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली होती.प्रशांत केळसकर यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. सदर स्पर्धा ही एक ग्रामपंचायत व खुला गट अशी खेळवण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या दिल दोस्ती दुनियादारी या संघाला रोख रुपये 20 हजार व चषक देऊन प्रशांत केळसकर परिवार व ग्रामदेवता कमिटी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.तर उपविजेत्या खेम वरदान पालपेणे संघाला रोख रुपये 15 हजार व चषक देऊन मान्यवरांच्यास्ते तसेच तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या सक्षम 11 वडद संघाला रोख रुपये 5 हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक पटकाविणाऱ्या आई नवलाई हेदवतड संघाला रोख रुपये 4 हजार व चषक देऊन मान्यवरांच्यास्ते गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून दिल दोस्ती दुनियादारी संघाचा साहिल याला, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून खेम वरदान पालपेणे संघाचा विवेक नवरत ,मालिकावीर म्हणून सक्षम 11 वडद संघाचा अक्षय मुरमुरे व अंतिम सामना सामनावीर बंड्या मोरे याला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदरची स्पर्धा श्री. सिद्धिविनायक मंदिर डावलवाडी रोड तळवली या ठिकाणी पार पडली.स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी स्पर्धा पुरस्कृत करणारे प्रशांत केळसकर व त्यांचा मित्रपरिवार ग्रामदेवता श्री सुकाई देवी कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण, उपाध्यक्ष अशोक सांगळे,सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार अनंत डावल,सुरेश सांगळे,दिलीप आग्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अमोल जड्याळ,गावचे गुरव सुनील गुरव,पोलिस पाटील विनोद पवार,पत्रकार आशिष कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत पंच म्हणून समित पवार, श्री धामणस्कर यांनी तर स्पर्धेचे समालोचन नरेश पवार व प्रशांत गावडे यांनी केले.सदर स्पर्धेचे सारसी इव्हेंटच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी ग्रामदेवता देवस्थान कमिटी व भक्तगणांनी विशेष मेहनत घेतली.









