कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूणच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन

जनगणनेच्या प्रश्न क्रमांक १२मध्ये ओबीसी रकाना पाहिजे

चिपळूण( वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ग्रामीण चिपळूण यांच्या वतीने चिपळूण तहसीलदार यांच्या मार्फत आगामी होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र रकाना नमूद करावा अशी अधिसूचना सरकारने काढावी यासाठी देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि भारत रजिस्टार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आगामी होणाऱ्या जनगणनेत ३३ प्रश्नांची सूची देण्यात आली आहे. त्यामध्ये १२ वा प्रश्न कुटुंबप्रमुख SC / ST की ‘इतर’ (Others) प्रवर्गातील आहे? असा आहे. परंतु, यामध्ये कुठेच ‘इतर मागास वर्गा’चा उल्लेख नाही. त्यामुळे या ३३ प्रश्नांमधून जमा करण्यात येणाऱ्या माहितीद्वारे इतर मागास वर्गासहित देशातील सर्वच जातींचा स्वतंत्रपणे तपशिल मिळू शकणार नाही. यासाठीच ओबीसींचा स्वतंत्र जातनिहाय रकाना पाहिजे.

केंद्र सरकार/गृह विभाग यांनी २३ एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार, जनगणना आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत इतर मागासवर्ग” रकाना समाविष्ट करण्यासाठी प्रश्न क्रमांक १२ मध्ये अशी सुधारणा करून नव्याने अधिसूचना जारी करावी. अन्यथा ओबीसींना तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. याबाबत कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने सात जिल्ह्यात एकाच दिवशी संघाच्या शाखांमार्फत तहसीलदार यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार चिपळूण संघ शाखा ग्रामीण यांनीही चिपळूण तहसीलदार यांना सोमवार ३० रोजी सकाळी ११.३० वाजता निवेदन देण्यात आले .
यावेळी संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष ॲड संतोष कुळे , सचिव हर्षल कुळे , खजिनदार भरत धुलप, उपाध्यक्ष महेश कातकर, संघ आणि युवाचे माजी पदाधिकारी रामचंद्र पालकर, दामोदर लोंढे , विलास डिके, कृष्णजी कोककमर, अमोल निर्मळ , राजेंद्र पवार, गजानन वाघे, निलेश खापरे, दिलीप कदम, महेश नाचरे, सौ कल्याणी कोकमकर, आणि सर्व समाज बांधव निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.