आपण एक वाटसरू पण आपल्या काळातील काम भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरेल!
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी
सिंधुनगरी | बाळ खडपकर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागील नेतृत्वाने लावलेले रोपटे आता वटवृक्ष होत आहे. या बँकेत काळानुरूप बदल होत गेले असून ही बँक आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. या जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी ही बँक जिल्हा वासियांना एकमेव पर्याय आहे! या बँकेवर जिल्हाध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली असून आपण एक वाटसरू आहोत. म्हणूनच आपल्या कारकिर्दीत सर्वोत्तम काम करावे व हे काम पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. ही बँक म्हणजे सहकारातील एक कुटुंब आहे, वा हे कुटुंब आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वोत्तम ठेवणार आहे असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना काढले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या प्रदान कार्यालयात त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यावर अनेक मान्यवराने शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी बँकेच्या संचालक गजानन गावडे प्रकाश मोर्ये आत्माराम ओठवणेकर सौ नीता राणे रवींद्र माडगावकर जिल्हा बँकेचे सीईओ प्रमोद गावडे आदी मान्यवर बँकेचे अधिकारी कर्मचारी व अन्याय संचालक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे रोपटे सकाळमध्ये श्री शिवराम भाऊ जाधव व डीबी ढोलम याने रुजविले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनामुळे पुढच्या काळात या बँकेने सहकार क्षेत्रात आपला नावलौकिक मिळविला. ही बँक व या बँकेची पत निर्माण करण्यात अनेकांचे योगदान आहे. आपल्याला या बँकेवर चेअरमन पदाची संधी मिळाली त्यानंतर या बँकेने प्रगतीचा आलेख कायमच चढता ठेवला.
या बँकेची पत उंचावण्यास व ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी काळानुरूप बदल केले. हे बँक आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करू लागली. या बँकेचे काम एक कुटुंब म्हणून सहकार क्षेत्रातील जिल्ह्यातील नेतेमंडळी जिल्हा बँकेचे सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने सुरू आहे. आपण केलेले काम पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावे असे काम आपण आपल्या कारकिर्दीत करणार आहोत. ही एक सहकारी संस्था असून जिल्हा वाशीय शेतकऱ्यांची ही बँक आहे. निकोप सहकारासाठी व त्या आधारित विकासासाठी या बँकेचे योगदान मोठे आहे. त्यामुळे हे एक कुटुंब समजून सर्वांनीच ही बँक आणखी मोठी करूया असे भावनिक आवाहनही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्वांना केले. मनीष दळवी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवसाच्या कार्यक्रम साजरा झाला. यावेळी त्यांचे त्यांचे अनेक मान्यवरानी त्यांचे अभिष्टचिंतन केले.












