सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना माजगाव येथील त्यांच्या समाधी स्थळावर विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचे स्मरण केले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव गुरुवर्य व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक सतीश बागवे, चंद्रकांत सावंत, आजी-माजी मुख्याध्यापक कृष्णा परब, बाळासाहेब पाटील, जगदीश धोंड, उपप्राचार्य नारायण देवरकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. धीरेंद्र होळकर उपस्थित होते.
याशिवाय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर, प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमेला आणि समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.











