प्रभात फेरीने केली मतदान जनजागृती
आचरा–अर्जुन बापर्डेकर : सातबारा हा आपल्या जमनीचा खूप महत्वपूर्ण दस्तऐवज आहे शासनाच्या अनेक योजना, दाखले मिळण्यासाठी सातबारा महत्वपूर्ण घटक असून पीक विमा, नुकसानभरपाई आदींबाबत ईपीकपाहणी होणे आवश्यक आहे .प्रत्येक शेतकऱ्यांनी हे ई पीक करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना उद्यूक्त करण्याचे आवाहन उंडील तलाठी सुनिता मेस्त्री यांनी फणसगाव कॉलेज येथे केले.महसूल सप्ताहानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत फणसगाव मंडल अधिकारी अशोक सावंत ,पाटगांव मंडल अधिकारी जनार्दन साईल,सुधीर साळुंखे, रमाकांत डगरे, प्रियांका गोसावी, ग्रामविकास अधिकारी विवेक नर,फणसगाव काॅलेज प्राचार्य श्रीमती नारकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.मंडल अधिकारी अशोक सावंत यांनी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पीकनोंदी,इतर दाखले याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर ग्रामविकास अधिकारी विवेक नर यांनी मतदान नोंदणी बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरवात मतदान जनजागृती फेरी ने केली गेली. ही फेरी फणसगाव कॉलेज ते उंडील तिठा दरम्यान काढण्यात आली.यानंतर फणसगाव तलाठी कार्यालयात आयोजित वारस तपास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.











