सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष शामसुंदर राय यांची मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
यावर्षी आंबा काजू चे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. उत्पन्नच कमी आल्याने वर्षभर केलेला खर्च भरून निघणे ही कठीण आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी बागायतदारांना ३० मे पूर्वी नुकसान भरपाई रक्कम, विमा रक्कम, कर्जमाफी पैकी नियमित भरणा प्रोत्साहन रक्कम तसेच मागील शासन येणे व्याज परतावा रक्कम द्यावी तरच शेतकरी चालू वर्षी कर्ज परतफेड करू शकतील, अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष शामसुंदर राय यांनी मांडली आहे.
आंबा कर्ज वाटप मुदत मागील एप्रिल ते चालू मार्च संपूर्ण वर्ष आहे. आणि परतफेड मुदत कर्ज घेतलेल्या दिनांका पासून ३६५ दिवस किंवा ३० जून २०२६ यापैकी पहिली असेल ती असे आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई लवकर मिळणे गरजेचे आहे.
या व्यतिरिक्त व्याज दर रुपये तीन लाख पर्यंत कर्जास सहा टक्के व्याज. मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के केंद्र आणि तीन टक्के राज्य शासन कडून व्याज रिफंड मिळते. पण सन २०२३,२४ चे व्याज २९ मार्च २०२६ ला जमा झाले. सन २०२४,२५ चे व्याज जमा झाले नाही. त्याचा विचार झाला पाहिजे. विमा उतरलेल्या शेतकऱ्यांची विमा पावती वरील क्षेत्र ग्राह्य मानावे आणि ते ग्राह्य असल्याने इतर कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही.
तसेच विमा न उतरलेल्या शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंद नसलेले क्षेत्र पीक पाहणी करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने हमी पत्रात उल्लेख करून ग्राह्य मानावे. कोणताही नुकसान ग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
फळपीक विमा उतरताना दुसऱ्या खातेदाराचे हमीपत्र चालते तर नुकसान भरपाई साठी का चालत नाही
सामायिक सातबारा वरील एका खातेदाऱ्यांनी दुसऱ्या खातेदाराची हमीपत्र किंवा संमती पत्र व कुलमुखत्यारपत्र हे जोडून दिल्यास त्या खातेदाराची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. जर फळ पिक विमा करिता संमती पत्र व हमीपत्र याद्वारे दुसऱ्या खातेदाराचा फळपीक उतरण्याकरिता मिळतो मग भरपाई का मिळत नाही हा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे. पंचनामे सुरू आहेत त्यामध्ये असे अनेक शेतकरी दुसऱ्या खातेदाराचे शंभर रुपये किंवा पाचशे रुपये च्या बॉण्डवर घेत असतील तर शासनाने सुद्धा ते अपात्र करू नये ही जबाबदारी कृषी व महसूल खात्याती आहे. जर तहसीलदार किंवा नोटरी हे ग्राह्य मानणे क्रमप्राप्त आहे, जेणेकरून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. फळ पिक विमा करिता चार हेक्टर ची मर्यादा फळपीक विमा उतरण्याकरिता आहे मग नुकसान भरपाई साठी का नाही. हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एखाद्या शेतकऱ्याचे चार एकर क्षेत्र आहे मग त्या शेतकऱ्याला दोन दोन हेक्टर ची मर्यादा का याकरिता फळ पिक विम्याचा डाटा वापरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे त्या नुकसान क्षेत्र मर्यादेच्या दोन हेक्टर मध्ये तो शेतकरी अधिक शेत्र असून दोन हेक्टर मध्ये सावरणार का याचाही विचार करावा व तशा स्वरूपात सूचना द्याव्या. अन्यथा क्षेत्र असून सुद्धा शेतकरी वंचित राहणार. कृषी विभाग व महसूल खात्याकडून जे जबाब फॉरमॅट पंचनाम्याचे आहे त्या एखाद्या व्यक्ती प्रत्येक पंचनामे घेत आहेत इतर खातेदारांचे संमती पत्र चालणार नाही त्यांनी वैयक्तिक नुकसान भरपाई करिता आपला प्रस्ताव सादर करावा असेही सांगण्यात येते. मुळातच तो बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी जर संमती पत्र दिलेली असेल खातेदाराला मग मग नुकसान भरपाई देण्यासाठी का या सर्व बाबतीमध्ये शेतकरी अक्षरशः संभ्रमात आहेत, याचाही खुलासा करून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी श्री. राय यांनी केली आहे.












