कोट येथील हत्या प्रकरणातील सोनाली चांदिवडे हिचे पनवेल कनेक्शन काय?

 

प्रश्न अनुत्तरित मात्र पोलिसांचा तपास त्या दृष्टीने सुरू

लांजा (प्रतिनिधी) पती-पत्नीच्या अंतर्गत संघर्षात बळी पडलेल्या सोनाली चांदिवडे ही खुनाच्या घटनेअगोदर पनवेल या ठिकाणी दहा दिवस जाऊन आली होती. तर घटनेच्या दिवशीही ती पुन्हा फनवेलला जाण्याच्या तयारी होती. त्यामुळे तीचे नेमके पनवेल कनेक्शन काय हा प्रश्न आता प्रकर्षाने पुढे आला आहे.
कोट येथील हत्याकांडानंतर अनेक प्रश्न सध्या अनुत्तीर्ण असून ते प्रकर्षांने पुढे आले आहेत. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. यात हत्त्येच्या घटनेत एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे आणि ती म्हणजे सोनाली चांदिवडे ही १९ ऑगस्ट रोजी दोन्ही मुलांना घरात सोडून व नवरा संदेश याला चिठ्ठी लिहून बेपत्ता झाली होती. ती पनवेलला गेली होती. पनवेल येथे संदेश चांदिवडे याचे या ठिकाणी कोणीही नातेवाईक नाहीत .त्यामुळे सोनाली चांदिवडे पनवेल या ठिकाणी नेमके कशासाठी व कोणाकडे जायची? तसेच गुरुवारी तीन ऑगस्ट रोजी तिची हत्या झाली त्या दिवशी देखील पहाटेच्या वेळी सोनाली ही पनवेल ला जाण्यासाठी निघाली होती ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे तिचे पनवेल कनेक्शन नेमके काय आहे? ती कोणत्या कारणासाठी पनवेलला जात होती? हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. सोनाली ही पनवेलला यापूर्वी संदेश याच्यासोबत त्या ठिकाणी गेली होती का? या दृष्टीनेही पोलिस सध्या तपास करत आहेत. असे असले तरी सोनालीचे पनवेल कनेक्शन नेमके काय आहे हा प्रश्न अनुत्तरीत असून याबाबत ् संदेशला काही माहिती असेल तर त्या दृष्टीने पुढील तपासाला गती मिळणार आहे.