मिरजोळे नाखरेकर वाडीत घरालगतच्या ढासळलेल्या विहीरीचे काम पूर्ण

 

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा

रत्नागिरी : मिरजोळे नाखरेकर वाडीत घरालगतची विहीर ढासळुन लगतच्या घराला धोका पोचला होता.

या कामाचा पाठपुरावा करून लगेचच कामाला सुरुवात केली होती. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे, सदरील कामाच्या ठिकाणी वाहतूक करताना गैरसोय होत होती, म्हणून विद्यमान सदस्य राहुल पवार यांनी काही दिवस कामाच्या ठिकाणी अडचण होऊ नये म्हणून बंद ठेवले होते, परंतु सदरील काम परत सुरू करून‌ आज पूर्ण केलेले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, तालुका प्रमुख बाबु म्हाप यांच्या सहकार्याने मिरजोळे सरपंच गजानन गुरव, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राहुल पवार,विभाग प्रमुख संदीप नाचणकर यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले.