न्हावेली – श्रेयस गावडे.
मळेवाड येथील युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे व ग्रामपंचायत मळेवाड कोंढुर यांच्या संयुक्त विद्यमानाने मळेवाड जकातनाका परिसरात १ मे ते ५ मे २०२६ या कालावधीत ‘मळेवाड सांस्कृतिक महोत्सव’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भक्ती संगीत, डान्स, ऐतिहासिक चित्ररथ आणि सौंदर्य स्पर्धा अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा आणि मान्यवर:
१ मे: कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते आणि मळेवाड ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर नाणोसकर यांच्या हस्ते होईल.
२ मे: नेरुरच्या शिमगोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते होणार असून, माजी सरपंच (नेमळे) श्री. विनोद राऊळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
३ मे: महोत्सवाचा मुख्य शुभारंभ सावंतवाडी नगरपालिकेच्या सौ. श्रद्धा लक्ष्मणराजे भोसले यांच्या हस्ते होईल. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य सौ. अपर्णा सातोस्कर आणि पंचायत समिती सदस्या सौ. धनश्री मराठे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
४ मे: या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब करतील. प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य श्री सुधा कवठनकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुचित्रा कदम, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ. सुश्मिता जाधव आणि पंचायत समिती सदस्य श्री. शरद धाऊसकर उपस्थित राहणार आहेत.
५ मे: सांगता समारंभाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोदजी कामत यांच्या हस्ते होईल जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिषजी दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
गेली अनेक वर्षे आपण हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आलो आहोत. यंदाचे स्वरूप अधिक भव्य असून, यात धार्मिक भक्तीपासून ते आधुनिक कलाविष्कारांपर्यंत सर्वच कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पाचही दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात आपण आपल्या सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.












