रत्नागिरी : बंदररोड येथील कित्ते भंडारी हॉल मध्ये रविवारी दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री राजेंद्र पाटील , कनिष्ठ अनुवाद अधिकारी , सीमा शुल्क मुंबईचे सत्यवान रेडकर , तसेच कर्नाटक लॉ कॉलेज मुंबईच्या प्राचार्य सौ मेघनाताई पाटील उपस्थित रहाणार आहेत .
या गुणगौरव कार्यक्रमामध्ये वरील मान्यवरांचे स्पर्धा परीक्षा आणि ईतर परीक्षांबाबत पालक व विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे . अनेक विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी नावनोंदणी केली आहे . अजुन ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संघाच्या मांडवी येथील कार्यालयात आणून देणे तसेच सर्व विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाच्या वेळेच्या आधी १० मिनीटे हॉल मध्ये उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे सचीव चंद्रहास विलणकर यांनी केले आहे .











