रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात स्वातंत्र्यदिना च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यार्थ्यांनसाठी च्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
*विद्यार्थ्यांन साठी उद्बोधक पुस्तकांचा खजिना.*
थोर स्वातंत्र्य सेनानी ,देशभक्त, युद्ध कथा चरित्र अश्या अनेक विषयांची 500 पेक्षा जास्त पुस्तक विद्यार्थ्यांन साठी प्रदर्शना मध्ये मांडण्यात आली आहेत.
*विद्यार्थ्यांन चा उस्फुर्त प्रतिसाद*
गेल्या 5 दिवसात 300 च्या घरात विद्यार्थ्यांनी या प्रदर्शना चा लाभ घेतला सोबत विद्यार्थ्यांनान बरोबर रोज काही गुरुजनांनी संवाद साधला संदर्भ देत गोष्टी ही सांगितल्या त्यामुळे प्रदर्शन पाहताना मुले अधिक हरखून जाताना दिसली.
दिनांक 12 ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन विद्यार्थ्यांन साठी खुले राहणार आहे.
*पुस्तक मैत्री चा संदेश*
स्वातंत्र्य लढ्या चा इतिहास थोर देशभक्तांनी दिलेले बलीदान, शौर्य कथा थोर, व्यक्तिमत्वाची चरित्र, विज्ञान कथा या मध्ये या प्रदर्शना ला भेट देणारी मूल रंगून गेली. मोबाईल च्या या युगात मुलांना पुस्तकां बरोबर दोस्ती चा मार्ग दाखवणारा हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे.
या नंतर ही अश्याच प्रकारचे नावीन्यपूर्ण नवे नवे उपक्रम विद्यार्थी वर्गासाठी आयोजित केले जातील असे वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन म्हणाले आणि उर्वरित 4 दिवसात या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा या साठी पालक वर्ग आणि शिक्षक वर्गाने आपल्या पाल्याना उद्युक्त करावे असे आवाहन पटवर्धन यांनी केले.












