गांगेश्वर विद्यामंदिर भुईबावडा प्रशालेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट

गांगेश्वर विद्यामंदिर भुईबावडा प्रशालेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट
मयूर क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
स्वप्निल कदम भुईबावडा
क्रांती दिना निमित्त गांगेश्र्वर विद्या मंदिर भुईबावडा येथे मयूर क्रिडा मंडळ आंबेवाडी यांच्यावतीने प्रशालेच्या मागणी नुसार शाळेस थोर नेत्यांचे फोटो फ्रेम भेट म्हणून देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित विस्तार अधिकारी श्री वडर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुणाल मोरे , मयूर क्रीडा मंडळ चे राजेंद्र मोरे , अनंत मोरे , प्रशांत मोरे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कुंभार, शिक्षक वृंद , ग्रामस्थ , पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे परमार्थाचे परमोच्च साधन म्हणजे दान .यानुसारच मयूर क्रीडा मंडळ समाजभान जाणून उत्तुंग असे कार्य करीत आहे .आपल्या मंडळाद्वारे आपल्या शाळेत भारतीय स्वातंत्र्य साठी तन-मन-धन अर्पण केलेल्या स्वातंत्र्यसेनानी , क्रांतिकारक, थोर समाज सुधारक , महात्मे यांचे फोटो फ्रेम भेट म्हणून दिले शालेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, भारतीय परंपरा समजण्यास नक्कीच उपयुक्त ठरणारे आहेत असे मत यावेळी कुणाल मोरे यांनी व्यक्त केले. त्यावेळी प्रशालेच्यावतीने मयूर क्रीडा मंडळाचे आभार मानण्यात आले मंडळाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी मयूर क्रीडा मंडळाचे सदस्य ग्रामस्थ शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.