संगमेश्वर | मकरंद सुर्वे : स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब संगमेश्वर ने 15 ऑगस्ट 2023 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय देशभक्ती पर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते माभळे येथील हॉलमध्ये मोठ्या जल्लोषाने ही स्पर्धा संपन्न झाली.
तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीच्या गटामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालय बुरुंबी प्रथम क्रमांक पटकावला तर पैसाफंड स्कूलने द्वितीय व श्रीमती कमला जाबाई मुळ्ये हायस्कूल कोळंबे तृतीय क्रमांक पटकावला इयत्ता आठवी व दहावी गटात दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल कसबा (मराठी माध्यम ) ने द्वितीय क्रमांक व श्रीमती कमलजाबाई मुळ्ये विद्यालय कोळंबे तृतीय क्रमांक पटकावला इयत्ता अकरावी ते बारावीच्या गटात दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी प्रथम क्रमांक पटकावला तर पैसाफंड हायस्कूलने द्वितीय व श्रीमती कमलजा मुंबई मुळे हायस्कूल कोळंबे तृतीय क्रमांक पटकावला न्यू इंग्लिश स्कूल देवरुख चे सेवां निवृत्त शिक्षक आळवणे व नेहाली गद्रे संगमेश्वर हे परीक्षक म्हणून यांनी पाहिले तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लब संगमेश्वर चे अध्यक्ष महेश उपळेकर खजिनदार रिंकू कोळवणकर, ला.गुलाम पारेख , ला.मनीष चोचे ,ला .सतीश पटेल, ला बापू भिंगार्डे ,ला योगेश भिंगार्डे, ला ,.विवेक शेरे, ला .दिलीप रहाटे ,ला रविकांत शिंदे व ला मनोहर पटेल उपस्थित होते तसेच ला.नेहा संसारे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले









