जिल्ह्यात होणाऱ्या नोकरभरतीत जिल्ह्यातीलच मुले हवीत:आ. नितेश राणे

जिल्ह्यात होणाऱ्या नोकरभरतीत जिल्ह्यातीलच मुले हवीत:आ. नितेश राणे

*तळेरे-खारेपाटण भाजपा विभागीय पक्षाच्यावतीने जि.प.भरतीअंतर्गत मार्गदर्शन व सहाय्य शिबिराचे उद्घाटन
तळेरे(वार्ताहर):
भविष्यात आपल्या जिल्ह्यात होणारी जी नोकर भरती आहे. या भरतीत आपल्या जिल्ह्यातीलच मुले भरती झाली पाहिजेत. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.२०१४ साली नारायण राणे साहेबांच्या हाती प्रशासन होते. त्यावेळी आपला जिल्हा पहिल्या पाचव्या क्रमांकावर होता.चांगलं काम करायचं प्रशासन टिकवायचं असेल, लोकांचा विकास करायचा असेल तर असे कार्यक्रम झाले पाहिजेत.जेव्हा शासकीय भरती होते तेव्हा जास्तीत जास्त तरूणांनी या परिक्षेसाठी सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले. तळेरे- खारेपाटण भाजपा विभागीय पक्षाच्यावतीने जि.प.भरतीअंतर्गत मार्गदर्शन व सहाय्य शिबीर कार्यक्रमात विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय ,तळेरे येथिल शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सभापती जयेंद्र रावराणे ,माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, राजेश जाधव, उपसरपंच शैलेश सुर्वे, कुरंगवणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, दिलिप नावळे, संदिप घाडी,भाऊ राणे राजेश माळवदे, उदय बारस्कर, पांचाळ,दिनेश मुद्रस, चिन्मय तळेकर,दळवी महाविद्यालयाचे समन्वय वेलंगी,दिपक नांदलसकर, मुख्याध्यापक मांजरेकर, चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले,या परिक्षेसाठी आपल्या मुलांना रत्नागिरी किंवा कोल्हापूर या दोन ठिकाणी जावं लागणार आहे. या परीक्षा केंद्राच्या यादी मध्ये रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हाही असावा असं सांगितलं आहे, तसं पत्रही देण्यात आले आहे.आमची एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त आपलीच मुले या सर्व परीक्षेतून उत्तीर्ण होतील आणि जिल्ह्याच्या भरतीत प्रावीण्य मिळवतील असे त्यांनी सांगितले.यावेळी दिलिप तळेकर ,राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थितांना मार्गदर्शन व सहाय्य शिबिराला मार्गदर्शक म्हणून गुरुकुल करियर अकॅडमी ओरस चे प्रा. ढोनकूस व प्रा बी एस जांभेकर यांनी उपस्थित राहून बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने आ. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील तरूण, तरूणी उपस्थित होते.
*(फोटो 17-):: तळेरे येथील जि.प.भरती शिबिरात मार्गदर्शन करताना आ.नितेश राणे सोबत जयेंद्र रावराणे, दिलीप तळेकर, हनुमंत तळेकर, वेलिंग सर आदी भाजपा पदाधिकारी(फोटो -गुरु सावंत).