कणकवली :विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या प्रशालेमध्ये पर्यावरण सेवा योजना, राष्ट्रीय हरित सेना व स्वच्छता विभाग मार्फत पर्यावरण पूरक नागपंचमी हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक माती पासून नागाच्या प्रतिकृती तयार करून त्या नागाच्या प्रतिकृतीमध्ये कांचन ,बांबू ,जांभूळ ,फणस ,काजू ,सिताफळ अशा प्रकारच्या झाडांच्या बिया या नागाच्या प्रतिकृतीमध्ये घालून ह्या मुर्त्या तयार केल्या व शाळेच्या परिसरामध्येच त्या नागाच्या प्रतिकृतीचे विसर्जन करण्यात आलं आणि या पद्धतीने पर्यावरण संवर्धनासाठी एक हातभार लावण्याचा एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे , पर्यवेक्षिका सौ व्ही व्ही जाधव ,पर्यावरण सेवा योजना प्रमुख श्री प्रसाद राणे ,हरितसेना विभाग प्रमुख श्री नागभीडकर सर ,कर्मचारी अरुण इंगळे, तसेच पर्यावरण सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग कणकवली विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थांनी बनविल्या पर्यावरण पूरक नागाच्या मूर्ती












