वरवेली ग्रा.प.च्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सन्मान, शिलालेखाचे अनावरण, वृक्षारोपण कार्यक्रम

गुहागर |  प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत च्या वतीने” माझी माती, माझा देश” अभियानातंर्गत दि. ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. सोमवारी सकाळी माजी उपसरपंच व जेष्ठ नागरिक भिकाजी महादेव शिंदे यांच्या ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंचप्राण शपथ झाली. शहीद जवानांच्या नावे उभारलेल्या शिलालेखाचे अनावरण सरपंच नारायण आगरे व उपसरपंच मृणाल विचारे व सदस्य, ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले . त्यानंतर संपूर्ण गावात अमृत वाटिका वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वरवेली ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये गावातील ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्या जेष्ठनागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण रांजाणे, पांडुरंग गावडे, किसन आगरे, सोनू राजाणे, गोपाळ रांजाणे, कृष्णा रांजाणे, मधुकर पवार, नंदकुमार विचारे, शंकर धुमक, पार्वती राजाणे, बाळाराम शिंदे, सुनंदा रांजाणे, इंदिरा गावडे, गंगा रांजाणे, इंदिरा राजाणे, धर्माजी आगरे, नामदेव रावणंग, गंगाधर नारकर ,महादेव रांजाणे, भिकाजी शिंदे, विजय रसाळ, सावित्री रांजाणे, इंदिरा गोरीवले, सावित्री सखाराम रांजाणे, राधिका कृष्णा भुवड, सावित्री पांडुरंग रांजाणें, सुनंदा राजाणे, सरस्वती’ करंदेकर ,रुक्मीणी रावणग, सुभद्रा रावणंग,रुक्मीणी गावडे आदीसह जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, सर्व ग्रा.प. सदस्य, माजी सरपंच सुप्रिया देसाई, पुनम रावणंग, जगन्नाथ शिंदे, वैभव पवार,पत्रकार गणेश किर्वे ,संतोष देसाई, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण आगरे, मधुकर बारगोडे, जितेंद्र विचारे, पोलीसपाटील सुजित शिंदे, आशिष विचारे, निलेश रसाळ, शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी,ग्रामसेवक महेश भुवड आदी मान्यवर उपस्थित होते.