आचरा दत्त मंदिरात साईचरीत्र पारायणाला सुरुवात

आचरा | अर्जुन बापर्डेकर : श्री साई सेवा मंडळ,आचरा तर्फे श्री. गुळगुळे यांच्या दत्त मंदिरात शनिवार दुपार पासू अखंड साईचरीत्र पारायणाचा शुभारंभ झाला आहे..
याची सुरुवात सांबारी यांच्या घरुन वाजत गाजत साईंची मुर्ती आणून दत्त मंदिरात मंदार सांबारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून स्थानापन्न केल्यानंतर करण्यात आली.यावेळी साईसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सलग ३६वर्षे हा पारायणाचा कार्यक्रम साईसेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात येत आहे.अखंड दोन दिवस चालणाऱ्या या पारायणात एकूण ५३अध्यायांचे वाचन विविध साईभक्त करत असतात.शनिवारी दुपारी सुरू झालेले पारायण रविवार दुपार पर्यंत अखंड सुरू असते.दुपारी महाप्रसादानंतर रात्री भजने नामस्मरणाच्या गजरात या पारायण सोहळा कार्यक्रमाची सांगता होते.