विलवडेतील युवकाचे अपघातात दुर्दैवी निधन

विलवडेतील युवकाचे अपघातात दुर्दैवी निधन
. ओटवणे (प्रतिनीधी ) विलवडे येथील रहिवासी तथा ग्रामोन्नती मंडळाचे सक्रिय सदस्य गजानन कृष्णा दळवी वय ४५,विलवडे-वरचीवाडी, आणि सध्या रा. बोरीवली-मुंबई) यांचे पुणे नजिक घडलेल्या घटनेत दुर्दैवी निधन झाले. पुणे (भिमा शंकर, शिडी घाट येथे आपल्या कुटुंबिय व सहकारी मित्रासोबत शनिवारी सकाळी ट्रँकींगला गेले होते. सायंकाळी शिडीघाट चढत असताना पाय घसरून सुमारे १०० फुट दरीत पडल्याने अपघाती मृत्यु झाला. त्यांच्या सोबत असलेल्या मित्र‍ाकडून सांगण्यात आले. गजानन दळवी हे मुंबई येथील मंडळाच्य‍ा १५ आँगस्ट  रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभेसही हजर होते. यात त्यांनी सहभाग घेतला होता व नवीन इमारत बांधकामाच्या योजनेत मोलाचे मार्गदर्शन केले होते. संस्थेच्या वाटचालीत व सर्व व्यवस्थापनात त्यांचा प्रामाणिक व सक्रिय सहभाग होता. विलवडे गावातली अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा शालेय स्नेहसंमेलन आयोजन, शाळेची नवीन इमारत बांधकाम, शाळेचे ऍसेट सत्यापन, कॉम्पुटर लॅबची व्यवस्था इत्यादीच्या व्यवस्थापनात त्यांचे भरीव योगदान होते. त्यांचे हे योगदान संस्थेच्या व कार्यकारिणीच्या वाटचालीत नेहमीच प्रेरणादायी होते . त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर ,विलवडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या जाण्याने संस्थेचे विलवडे गावाचे  कधीही न भरून येणारे मोठे नुकसान झाले.त्यांच्य‍ा पश्चात आई, पत्नी, भाऊ,मुलगा, असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने विलवडे गावात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.