देवगड (प्रतिनिधी)
तालुक्यातील सांडवे मसुरकरवाडी येथील श्री राघोजी महादेव मसुरकर (७८) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलगा निलेश राघोजी मसुरकर यांनी देवगड पोलिसात स्थानकात दिली आहे.
राघोजी मसुरकर हे शनिवारी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घराबाहेर पडले
ते पुन्हा परत आले नसल्यामुळे त्यांची शोधा शोध करण्यात आली.मात्र त्यांचा कोठेही शोध लागला नसल्याने त्यांच्या मुलगा निलेश यांनी आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार देवगड पोलिसात रविवारी दिली आहे. याबाबतच्या अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार करत आहेत.












