सावंतवाडी : प्रतिनिधी : सावंतवाडी खासकीलवाडा परिसरात आयुर्वेदिक कॉलेज शेजारील वालावलकर पाणंद येथील रस्त्यांच्या शेजारी वाढलेल्या झाडीमूळे नागरिक त्रस्त झाले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिका प्रशासनाने झाडी तोडली मात्र ती अर्धवट तोडल्याने तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने पूर्ण झाडी तोडावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा वालावलकर पाणंद येथे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. ही झाडी तोडण्यात यावीत, अशी मागणी लेखी स्वरूपात तेथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु वारंवार मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
त्यानंतर अखेर न.प. प्रशासनाला जाग आल्यानंतर त्यांनी मंगळवारी तेथील झाडी तोडण्याचे काम हाती घेतले. पण सबंधित काम अर्धवट केल्याने तेथील नागरिकांना ये – जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या या अर्धवट धोरणाने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी रस्त्यालगत वाढलेली झाडी ‘अर्धवट ‘ तोडल्याने खासकीलवाडा येथील नागरिक त्रस्त












