पी.एम.स्‍व निधी योजनेला वेंगुर्ले शहरात चांगला प्रतिसाद

 

व्यवसाय उभारण्यासाठी ३४४ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

वेंगुर्ले : दाजी नाईक : वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या पी.एम.स्‍व निधी योजनेला वेंगुर्ले शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत व्यवसाय उभारण्यासाठी ३४४ लाभार्थ्यांनी घेतला लाभ आहे. तरी शहरातील ज्या पथविक्रेत्यांना कर्ज प्रस्ताव करायचा आहे त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी म्हणजेच पी.एम.स्‍व निधी ही पथविक्रेत्यांसाठी विशेष योजना आहे. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी सूक्ष्म पतपुरवठा केला जातो त्यामध्ये प्रथम टप्पा १००००/- रुपये कर्ज, दुसरा टप्पा २००००/- रुपये कर्ज आणि तिसरा टप्पा ५००००/- हजार रुपये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

वेंगुर्ला नगरपरिषद ने आतापर्यंत बँकांच्या माध्यमातून १०,०००/- रुपये २०५ लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ देण्यात आला. २०,०००/- रुपयाचे ११० लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ देण्‍यात आला व ५०,०००/- रुपयाची २९ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्‍यात आले आहे. याही पुढे वेंगुर्ला शहरातील ज्या पथविक्रेत्यांना कर्ज प्रस्ताव करायचा आहे त्याने वेंगुर्ला नगरपरिषद कक्षाशी श्री. विलास ठुंबरे सहायक प्रकल्प अधिकारी संपर्क क्रमांक – ९४२२८७०६८२ यांच्याशी संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.