जलजीवन मिशन अंतर्गत ब्राह्मणपाट विहिरीचे भूमीपूजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

जलजीवन मिशन अंतर्गत मळगांव ब्राम्हणपाट विभागासाठी मंजूर विहीरीचे भुमीपूजन मळगांव सरपंच सौ.स्नेहल जामदार व उपसरपंच हनूमंत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ब्राम्हणपाट मायापूर्वचारी मंदिरालगत ही विहीर होणार असून या कामासाठी सुमारे ६० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर विहीरीसाठी स्थानीक ग्रामस्थ प्रमोद खानोलकर यानी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्यामूळे ब्राम्हणपाट भागातील गेली अनेक वर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न मार्गी लावणे सोयीस्कर झाले. त्यामूळे सरपंच व उपसरपंचांसहीत सर्वानी यावेळी प्रमोद खानोलकर यांचे आभार मानले.

समाजात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. परंतू प्रमोद खानोलकर यांच्यासारख्या सेवाभावी व्यक्ती गावात असतील तर गावाचा विकास दूर नाही, असे गौरवोद्गार यावेळेस सरपंच स्नेहल जामदार यांनी व्यक्त केले.

या भूमीपूजन प्रसंगी माजी सभापती राजू परब, ग्रामपंचायत सदस्या निकीता राऊळ, अनुजा खडपकर, रामचंद्र सावळ, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, गुरुनाथ गावकर, पुरोहित विजय जोशी, काका गांवकर, निलेश राऊळ, दीपक जोशी,बाबू राऊळ, रामनाथ राऊळ, प्रमोद खानोलकर, पांडुरंग राऊळ बापू राऊळ जितेंद्र राऊळ गजानन राऊळ भास्कर राऊळ मयुरेश नाईक रत्नप्रभा नाईक समीक्षा पडवळ नूतन पडवळ अनिता राऊळ राजश्री राऊळ रसिका नाईक रामनाथ राऊळ गोपी राऊळ दिपेश राऊळ सुरज राऊळ समीर परब अंकुश राऊळ शिवराम उर्फ बाबी राऊळ यांसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

Sindhudurg