केंद्रशाळा उभादांडा नं.1 चे आयोजन.
वेंगुर्ले : प्रतिनिधी :विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकास व इतर विविध शैक्षणिक उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगुर्ले तालुक्यातील उभादांडा नं.1 शाळेत मान्सून फेस्टीव्हल 2023 या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी विविध उपक्रम, चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे, प्रदर्शने व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
चार भींतींच्या चाकोरीत राहून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना मूक्त, दडपणविरहीत व आनंददायी वातावरणात अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. या उपक्रमामुळे अभ्यासक्रमातील अनेक उद्दिष्ट्ये साध्य होण्यास मदत हाणार आहे. शाळेत राबवत असलेल्या मान्सून फेस्टीव्हल अंतर्गत सर्व उपक्रमांमध्ये सर्वच मुले आपल्या आवडीनुसार हिरीरिने सहभागी होवून आपले कौशल्य सादर करत आहेत. पालकही मुलांची तयारी करून घेण्यासाठी वेळ देत आहेत.नविन शैक्षणिक वर्षात या शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम सुरू केल्यामुळे मुलांमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला आहे. पालक व विद्यार्थांमध्ये उत्साह व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी विकास केंद्रबिदू मानून सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. असे मत मुख्याध्यापक श्री.गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदीप परूळेकर, अनंत रेडकर व सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शतकोत्तर अमृत महोत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.












