युवा सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आलमेडा यांचा महाधर्मगुरू बिशप ऑलवीन बरेटो यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ले | प्रतिनिधी : सावंतवाडी नवसरणी केंद्र येथे कणकवली भिरोडा पॅरीश च्या वतीन वेंगुर्ले येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस आलमेडा यांचा सत्कार महाधर्मगुरू बिशप ऑलवीन बरेटो यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री. बावतीस घोन्सलवीस मित्र मंडळ हेंच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्यातील क्रिस्ती सामाजिक, राजकारणी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. आनारोजीन लोबो, जि. प. सदस्य श्री. लोरेन्स मान्येकर, श्री. मायकल डिसोजा, श्री. व्हिक्टर डॉनटस, श्री. जॉन नरोना, कडावल सरपंच श्री. पिंटो, सौ. मारिया डिमेलो, सौ. एलीजा घोन्सलवीस, श्री. मॅक्सी पिंटो, सौ लुईजा फर्नांडिस, श्री. रिचर्ड डिमेलो, यांना देखील सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला फा. मिलेट डिसोझा, फा. फेलिक्स लोबो, फा. रायमंड लिसबोन, फा. विल्यम सालदाना, फा. फ्रांन्सिस डिसोझा, फा. फिलिप घोन्सलवीस, फा. इलीयस रॉड्रिक्स, फा. मनवेल डिसिल्वा इत्यादी धर्म गुरुच्या उपस्थितीत महाधर्मगुरु ऑलवीन बरेटो यांच्या हस्ते सर्वाना सन्मानित करण्यात आले. ऑलवीन बरेटो, लोबो मॅडम, तसेच जॉन नरोना श्री. व्हिक्टर डॉनटस,यांनी मार्गदर्शन केले व प्रसिद्ध कवी श्री. रुजरिया पिंटो यांनी सुंदर अश्या कविता सादर केल्या. फा. मिलेट, फा. फेलिक्स लोबो यांनी सूत्र संचालन व आभार मानले.