कातकरी समुदायातील महिला व बालकांचे ‘पोक्‍सो कायदा’ जनजागृती साठी वेंगुर्लेत कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला आणि मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरातील कातकरी समुदायातील महिला व बालक यांचे ‘’लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम कायदा २०१२’’ (पोक्‍सो कायदा) या कायद्याची जनजागृती व्हावी व त्यास कोणीही बळी पडू नये या हेतूने दिनांक २६ ऑगस्‍ट २०२३ रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे दुपारी ३.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. कातकरी समाजातील महिला व मुलांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहामध्‍ये आणणे व लोकाभिमुख शिक्षण घेणे, महिलांचा नवीन बचत गट स्‍थापन करणे त्‍याच बरोबर विविध प्रशिक्षणे देणे या उद्दात हेतूने नगरपरिषद मार्फत कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी च्या प्राध्यापिका श्रीम. माया राहाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी कातकरी समाजातील जास्‍तीत जास्‍त महिला व बालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्‍हावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री परितोष कंकाळ यांनी केले आहे.