भाजपा नेते निलेश राणे यांनी फाले कुटुंबीयांना दिला मदतीचा हात

 

भाजप पदाधिकाऱ्यांनी फाले कुटुंबियांना सुपूर्त केली मदत

कुडाळ | प्रतिनिधी : महादेवाचे केरवडे येथील वीज कर्मचारी धनंजय फाले या युवकाचे कुडाळ येथे काम करीत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आधारस्तंभ गेल्याने कुटुंबीयांना आधार देता यावा, या सामाजिक बांधिलकीतून कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख व माजी खासदार निलेश राणे यांच्यावतीने त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला.

ही मदत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फाले कुटुंबीयांजवळ सुपूर्त केली. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, प्रकाश मोरये, मोहन सावंत, पंढरी परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी आपल्या कुटुंब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून जे काय सहकार्य लागेल ते आवश्यक करून असे आश्वासन देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना दिले.