अखेर लांजा साटवली मार्गावर बसवले पाच ठिकाणी स्पीड बेकर

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

संतोष कोत्रे | लांजा : लांजा तालुका शिवसेना( शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिका आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे अखेर लांजा साटवली या वर्दळीच्या मार्गावर पाच ठिकाणी स्पीड बेकर बसवण्यात आले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी नागरिक यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लांजा महिलाश्रम तसेच डीजे सामान इंग्लिश मीडियम स्कूल आणि लांजा भटवाडी शाळा अशा तीन ठिकाणी पाच स्पीड बेकर बसवण्यात आले आहेत. त्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई ,लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, तसेच शहर प्रमुख सचिन डोंगरकर, नगरसेवक प्रसाद डोर्ले आणि युवा सेना शहराधिकारी प्रसाद भाईशेट्ये उपस्थित होते.