चिपळूण (वार्ताहर) :तालुक्यातील बामणोली गावचे सुपुत्र आणि मराठा सेवा संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चांदिवडे यांची नुकतीच बळीराज सेना पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.गेली अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे प्रकार चांदिवडे हे पनवेल येथे राहत आहेत. त्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून परिवर्तनवादी चळवळीची धुरा सांभाळली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी नेहमीच उल्लेखनीय कार्य केले आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न राजकीय समिती यांच्या माध्यमातून बळीराज सेना पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे .या पक्षाचे पक्षप्रमुख अशोक वालम यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे काम सुरू करताना अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत आहेत.
रायगड जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी सक्षम व्यक्तीचे नेमणूक व्हावी याच हेतूने बळीराज सेना पक्ष्याच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रकाश चांदिवडे यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली आहे.बळीराज सेनेमध्ये सर्व बहुजन कष्टकरी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाटचाल केली जाणार आहे. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री चांदिवडे यांची निवड झाल्याबद्दल कुणबी युवा चिपळूण, कुणबी संघ शाखा चिपळूण, ओबीसी संघर्ष समन्वय समिती चिपळूण आणि हितचिंतक यांनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.












