खेड Breaking : वारस तपासासाठी 500 रुपये लाचेची मागणी करणारा शिवतरच्या तलाठ्यावर गुन्हा दाखल

खेड | प्रतिनिधी :

अमोल महावीर पाटील (31 वर्षे), तलाठी सजा शिवतर, याला 500 रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने जेरबंद केले.

यातील तक्रारदार यांचे वडिल हे सन 2014 साली मयत झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास होऊन तक्रारदार यांचे नावे दाखल करण्यासाठी आलोसे अमोल पाटील तत्कालीन तलाठी सजा शिवतर यांनी तक्रारदार यांचेकडे 1000/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17/02/2023 रोजी पडताळणी केली असता 500/- रुपये लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून दिनांक 28/08/2023 रोजी भ्र. प्र.अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे लाच मागणी गुन्हा खेड पोलीस ठाणे जि. रत्नागिरी येथे दाखल करण्यात आला आहे.

*कारवाई पथक -* अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, पोह. विशाल नलावडे, पोकॉ.राजेश गावकर, मपोकॉ.वैशाली धनवडे चापोना.प्रशांत कांबळे

 

▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*

श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधिक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी

 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*

 

मा.श्री. सुनिल लोखंडे,

पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र

 

मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र

 

 

 

▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी* –

जिल्हाधिकारी, रत्नागिरी