रत्नागिरी : भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या रत्नागिरी तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी सागर सुरेश खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याला चंद्रकांत खेडेकर अनुमोदन दिले. या निवडी दरम्यान तालुक्यातील अनेक समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. ही निवड एकमताने करण्यात आली.











