१४ व्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत ऑक्सफर्ड हायस्कूल ,मालवणीच्या खेळाडूंनी ७ पदके केली प्राप्त

ओडिशा ( भुवनेश्वर) येथे २५ ते २७ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या १४ व्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळाडूंनी एकूण १० पदके प्राप्त केली. त्यामध्ये ऑक्सफर्ड हायस्कूल ,मालवणी, मालाड (प.) मधील खेळाडूंनी ७ पदके प्राप्त केली. त्यात १ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य पदके तर रोझ मेरी इंग्लिश हायस्कूल , मलावणी,मालाड (प.), शाळेच्या खेळाडूंनी १ पदक प्राप्त केले. त्यात १ रौप्य तसेच मोहन स्पोर्ट्स अकॅडमीने २ सुवर्ण पदके अशी एकूण १० पदके प्राप्त केली .
सुवर्ण पदके :- ऋतिक मौर्या, अरविंद डोके, अदनान शेख

रौप्य पदके :- अनम शेख, अरमान शेख, मारूफ अन्सारी

कांस्य पदके :- सिमरन अन्सारी, याफिया शेख, युसुफ शाह, समीर चौधरी
पदके जिंकलेल्या सर्व खेळाडूंचे तसेच मुख्य प्रशिक्षक मा. संतोष गुलदेकर सर व प्रशिक्षक श्री. गौरव अशोक पांचाळ सर ह्यांचे हार्दिक अभिनंदन….