संसदेचं १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशन

दिल्ली : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यामध्ये १० हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जातील.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये ५ बैठका होणार आहेत. या अधिवेशनात १० हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. याच विधेयकांमुळे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.