डंपरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू 

चौके प्रतिनिधी :- शुक्रवारी सायंकाळी 7:20 वाजण्याच्या सुमारास मालवण होऊन चौके च्या दिशेने येणाऱ्या डंपरला चौके धनगराचा गोठा येथे दुपचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील युवकाचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाला.

 

चौके नांदरुख 1परिसरात राहणारा चंद्रकांत यशवंत चव्हाण 40 हा युवक नेहमीप्रमाणे दुचाकी एक्टिवा अॅक्टिवा MH07 AD1633 याने आपला मेव्हणा याच्यासोबत कामावरून घराच्या दिशेने येत असताना अगदी घराच्या काही अंतरावर असलेल्या मालवण कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे डंपरला MH07X 0666 ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन डंपर खाली गेल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेला मेव्हणा. महादेव पांडुरंग लाड राहणार रांगणा तुळसुली सध्या राहणार चौके याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची खबर मिळतात चौकी येथील राजा गावडे संतोष गावडे बिजी गावडे बंड्या गावडे साई गावडे सचिन आंबेरकर यांच्यासह चौके ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.अपघातात मृत्युमुखी पावलेला चंद्रकांत हा गरीब कुटुंबातील विवाहित युवक सेंट्रींग चे कामे करायचा शांत स्वभाव व सर्वत्र परिचित असा होता. त्याच्या पश्चात पत्नी शिक्षण घेणाऱ्या दोन मुली एक मुलगा असा परिवार असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर यांनी अपघाताची माहिती दिली मालवण पोलीस घटनास्थळी येत पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामाची कारवाई चालू आहे.