राजापुरचे माजी नगरसेवक गोविंद बाकाळकर यांचे निधन

 

राजापूर | प्रतिनिधी : येथील नगर परिषदेचे माजी नगरसेवक व वरचीपेठ येथील रहिवाशी गोविंद विठ्ठल बाकाळकर (82) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

एक शांत, संयमी आणि मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले बाकाळकर भाई बाकाळकर या टोपण नावाने ओळखले जात. त्यांनी पाच वर्षे नगर सेवक म्हणून काम केले. या काळात त्यांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांना न्याय दिला.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. बुधवारी सांयकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची पाणज्योत मालावली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बुधवारी रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.