खेड(प्रतिनिधी) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या आदेशानुसार येथील तहसीलदार सुधीर सोनवणे यांना बोधगया मुक्ती बाबतीत दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेडचे वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सदरहू प्रसंगी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड अंतर्गत अध्यक्ष के.मोरे,अध्यक्ष प्रकाश कांबळे, बी.एस.पवार, डी.ए. जाधव, डी.एस.हळदे, महादेव लोखंडे,धर्मराज हळदे, सखाराम जाधव, आयु.शांताराम कवडे, रवींद्र तांबे, सुनिल तांबे, दिलीप सकपाळ आदी उपस्थित होते.








