फोंडाघाट : शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी गुरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या उदय रमेश शिरवलकर वय १६ राहणार फोंडाघाट- साईनगर हा तोल जाऊन देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यामध्ये पाण्यात पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. याची खबर मिळता पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार झालेली नव्हती. तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे प्रथमदर्शनी मृत्यू झाल्याचे समजते व आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्याला वाचवण्यात अपयश आले असावे, असा अंदाज वर्तवला जातोय.
कालव्यामध्ये जरी वाहते पाणी नसले तरी दोन दिवस पडलेल्या पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साठले होते व कदाचित मातीमध्ये रुतून वेळीच बाहेर पडता न आल्यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे…










