मद्यसाठा आणि भारत बेंज कंपनी ट्रक असा एकूण 82 लाख 55 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग लांजा विभागाकडून देण्यात आली माहिती
लांजा (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोंडये येथे पकडलेला विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि भारत बेंझ कंपनीचा ट्रक कंटेनर असा एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमा हा ८२ लाख ५५ हजार रुपये किमतीचा असल्याची माहिती लांजा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बुधवारी ६ सप्साटेंबर रोजी सायंकाळी देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर कोंडये बीचवर पाळत ठेवून सदर जागेतून विनापरवाना गोवा राज्य विदेशी मध्याचे वाहतूक करणाऱ्या भारत बेंज कंपनीचा ट्रक कंटेनर हा पकडला होता. आज बुधवारी सहा सप्टेंबर रोजी लांजा उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी सदर मुद्देमालाची मोजणी करण्यात आली. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटी विदेशी मद्याचे ६५५ बॉक्स आणि भारत बेंज कंपनीचा ट्रक कंटेनर (क्रमांक एम एच ४६ ए एफ ६१८३) असा एकूण ८२ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी महावीर मारुती भोसले व ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ऄ) (इ) ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या मध्यसाठ्याचा मालक सोमनाथ उर्फ बापू तुकाराम भोसले व शेखर भोसले यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई चे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार सह आयुक्त सुनील चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई निरीक्षक यांच्या पथकाने दिनांक ६ सप्टेंबर रोजी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस एन इंगळे दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते तसेच वाय व्ही पाडळे तसेच राज्य उत्पादन शुल्क लांजाचे निरीक्षक विक्रम सिंहमोरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए.के .हिप्परिकर ,जवान डी.बी. कळंबे, एक.एच. जाधव यांनी भाग घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास पुढील तपास निरीक्षक रियाज खान व विजयकुमार थोरात, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. एन. इंगळे हे करत आहेत.












